Saturday, June 1, 2019

अष्टविनायक दर्शन

अष्टविनायक दर्शन 
गणपती बाप्पा मोरया
महाराष्ट्र मधील श्री एकदंताचे स्वयंभू आणि जागृत अष्टविनायक दर्शन त्याबाबत थोडक्यात आणि महत्वाची   माहिती . 

ब्लॉग बद्दल :   ह्या ब्लॉग मधून तुम्हाला अष्टविनायक दर्शन विषयी संपूर्ण माहिती मिळेल.  यात्रा  विषयी  सर्व  माहिती , कोठून सुरवात करावी , कोठे राहावे , बुकिंग  कसे करावे याबाबत सर्व माहिती . काही त्रुटी असतील तर कंमेंट सेकशन मध्ये अभिप्राय लिहावा . 

अष्टविनायक दर्शन बदल काही नियम :
  • अष्टविनायक दर्शन  मोरगांव पासून सुरु आणि शेवट करावे .
  • यात्रा चालू केल्यावर खंड न करता पूर्ण करावी .
अंदाजे ख़र्चे : ३०००/- रुपये (२०१९ )
 दर्शनाविषयी माहिती हि खालीलप्रमाणे 

अष्टविनायक दर्शनची ५ मंदिरे पुण्याच्या जवळ असल्याने जर तुम्ही भारत देश मधून कोठून पण येत असलातरी पुणे हे मध्यमवर्ती शहरं पासून यात्रा चालू करू शकता . पुणे मधून खूप साऱ्या खाजगी आणि 
शासकीय यात्रा कंपनीच्या बसेस किंवा आपल्या गरजेनुसार स्वतः पण करू शकता . 


दर्शनाचा अनुक्रम :

१. मोरगांव 
२. सिद्धटेक 
३. पाली 
४. महड 
५. थेऊर 
६. लेण्याद्री 
७. ओझर 
८. रांजणगाव  



दर्शनासाठी लागणारा वेळ : २-३ दिवस 


प्रतिव्यक्ती भाडे (भोजन, लॉज आणि अल्पोपहार सहित ) : २०००/- रुपये *(२०१९ च्या नुसार ) 

दर्शनसाठीच्या ऑनलाईन वेबसाइट 

https://www.laxmitour.com/
https://www.kesari.in/tourIti/Speciality-Tours/Marigold/OA/ASHTAVINAYAK-YATRA
https://www.ashtavinayak.net/pune-booking.php
https://www.yatra.com/bus-tickets/pune-to-ashtavinayak-darshan
https://www.balajicabs.co.in/pune-ashtavinayak-tour-package.html

जवळील रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट  : पुणे 
जवळील बस स्थानक : स्वारगेट, शिवाजीनगर , पिंपरीचिंचवाड  

मराठी चित्रपटातील श्री अष्टविनायका तुझा महिमा कसा ह्या गाण्यांमधून खूप सुंदर प्रकारे वर्णिला आहे , मी माझ्या अनुभवावरून आणि तुमचा यात्रा प्रवास सोयीस्कर जाण्यासाठी खालील माहिती देत आहे 

दिवस  १
१. मोरगांव: श्री मयुरेश्वर 
अंतर : पुणे सासवड मोरगांव: ६४. ५ किमी (२ तास ), पुणे चौफुला मोरगांव ७६ किमी , मुंबईपासून २२५किमी 
सकाळी ५ वाजता पुण्यापासून सुरवात करावी, पहाटे प्रवास सुरवात केल्यावर आपणस पहिल्या दिवशी ४ गणपती आणि दुसऱ्यादिवशी ४ गणपती दर्शन करता येतील . मंदिराला ११ पायऱ्या असून सभा मंडपी नंदी आहे आणि सर्व मंदिरामध्ये गणपती समोर नंदी असणारे हे एकमेव स्थान आहे . चिंचवड येथील श्री मोरया गोसावी यांचे हे जन्मस्थान आणि त्यांना करहा नदी पात्रात गणेशमूर्ती सापडली होती जायची प्रतिष्ठपना चिंचवडला केली गेली आहे .     

  अल्पोपहार ब्रेक : ३० मिनिटे 

२. सिद्धटेक : श्री सिद्धिविनायक 
मोरगांव ते सिद्धटेक दौंड मार्गे ७२ किमी, २ तास,  अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची ही एकमेव मूर्ती आहे म्हणून त्याला सिद्धिविनायक म्हणतात . मंदिर हे गावाच्या एका टोकाला असल्यामुळे जर मंदिराला प्रदक्षिणा घालवायचा असल्यास १ किमी पूर्ण प्रदक्षिणा घालावी लागते . हे स्थान भीमा नदीच्या  जवळ आहे आणि पूर्वीच्या वेळी मंदिराला जावयाचे असल्यास नावेने जावे लागत पण आता नदीवर पूल बांधण्यात आला आहे. ह्या दर्शनानंतर आपण भोजन चा ब्रेक घेऊन पुढील दर्शन यात्रा लवकर चालू करू शकता.   

  भोजन मध्यनाह : ३० मिनिटे 


३. पाली : श्री बल्लाळेश्वर
    सिद्धटेक ते पाली मार्गे पुणे : २२५ किमी ५ तास. 
    पाली गावंच्या बल्लाळेश्वरा आदी देव तू बुद्धिसागरा स्वयंभू मूर्ती पुर्वाभिमुख सुर्य नारायण करी कौतुक , अश्या २ ओळी मधूनच पाली येथील श्री बल्लाळेश्वर चा महिमा कळून येतो . मंदिराचे सर्व बांधकाम चिरेबंदी पाषाणाचे आहे . 

४. महड: श्री वरदविनायक 
   पाली ते महड : ३८ किमी , १ तास

पहिला दिवस संपल्यावर  भक्त निवास मध्ये राहण्याची व्यवस्था 

दिवस २ :
५. थेऊर : श्री चिंतामणी 
सकाळी ५:३० वाजता दुसऱ्या दिवसाची सुरवात करावी , पुणे एक्सप्रेस मार्गे थेऊर ला यावे 
 महड ते थेऊर : १०८ किमी , ३ तास

अल्पोपहार ब्रेक : ३० मिनिटे 

६. लेण्याद्री : श्री
 गिरिजात्मक 
थेऊर ते लेण्याद्री : ९८ किमी , २.५ तास 
लेण्याद्री चे श्री गिरिजात्मक येथे २८ लेण्या  आहेत आणि त्याला गणेश लेणी म्हणतात . मंदिराला जाण्यास ३०० पेक्षा जास्त पायऱ्या आहेत आणि श्री ची मूर्ती भिंतीत स्वयंभू प्रकट झाली आहे आणि मंदिराला कोठेही खांब नाही . येथे गणेश गिरिजेचा म्हणजेच पार्वती मातेचा आत्मज म्हणजे पुत्र असल्याने त्याला श्री गिरिजात्मक नावाने म्हणतात . 

७. ओझर : श्री विघ्नहर
लेण्याद्री ते ओझर  : १८ किमी , २० मिनिटे

  भोजन मध्यनाह : ३० मिनिटे 

८. रांजणगाव : श्री महागणपती
ओझर ते रांजणगाव : ५३ किमी , १.५ तास

सर्व गणपती मंदिर मध्ये गणपतीची आरती होते . 

यात्रा दरमयान लागणाऱ्या  महत्वाच्या वस्तू : २ दिवसापुरती लागणारी कपडे , उन्हाळ्यात जाणार असल्यास पाणी भरपूर घेऊन जावे आणि प्यावे, काही लागणारी औषधे, अल्पाहारासाठी थोडे हलके पदार्थे गरजेनुसार. 

प्रत्येक शनिवारी पुणे येथून यात्रा चालू होते , सोबत मार्गदर्शक आणि सर्व व्यवस्था सहित यात्रा होण्यासाठी पुणे हे सर्वात सोयीचे ठिकाण आहे , हा ब्लॉग वाचत राहा . यात्रा विषयी सर्व माहिती उपडेट होत राहते . काही माहिती हवी असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये जरूर कंमेंट करा . मी खालील वेबपेज देत आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून आपण अष्टविनायक दर्शन  विषयी माहिती घेऊ शकता . 

https://www.laxmitour.com/

अष्टविनायक दर्शन घेण्यासाठी रोज खूप भाविक मनोभावे सर्व मंदिरात येत असल्यामुळे , मंदिर आणि मंदिर परिसर स्वच्छ ठेवावा , कोठेपण घाण करू नये आणि मंदिराचे सौंदर्य कमी करू नये . आपली यात्रा संपन्न होवो आणि श्री अष्टविनायक आपली सर्व मनोकामना पूर्ण करो . काही त्रुटी असतील तर कंमेंट सेकशन मध्ये अभिप्राय लिहावा . 







1 comment:

  1. Hi,

    Hey its really very nice thing. thanks for posting... Tirupati is really an amazing place, Awesome post about tirupati darshan online booking and accommodation services.…!!

    Regards
    tirupati darshan online booking

    ReplyDelete

Thanks for the comment!