Wednesday, June 26, 2019

वारी पंढरीची, पंढरपूर यात्रा दर्शन माहिती


पंढरपूर यात्रा दर्शन माहिती 

ना पावसाची भीती 
ना उन्हाची झळ 
फक्त भक्तिभावाची कल
भेटेल तो माऊली विट्ट्ल 


थोडकयात पण महत्वाचा ब्लॉग

पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे चंद्रभागेच्या तीरावर वाळवंटी वसलेलं गाव .
सर्वात अगोदर पंढरपूर क्षेत्राचे नाव मुखी आल्यावर सर्वाना विठू माउली आणि रखुमाई चे नाम येते . दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनास येतात.

ह्या ब्लॉग मध्ये अशी माहिती देत आहे , जे आपल्याला महत्तवपूर्ण आणि  यात्रा संपन्न होईल अशी असेल .



पंढरपुरी कसे जावे : विठूमाऊली चा गावी जाण्यास महाराष्ट्रातून बहुतांश ठिकाणाहून बस आणि रेल्वे सेवा उपलब्ध आहे . जर आपणास थेट बस किंवा रेल्वे सेवा उपलब्ध होत नसल्यास जवळील जिलह्यास यावे . वारी काळात संपूर्ण महाराष्ट्रात जादा बसेसची व्यवस्था केली जाते.
जवळील जिल्हे : सोलापूर, पुणे, कोल्हापूर , सांगली , सातारा , लातूर.




चंद्रभागा : जर आपण सोलापूर मार्गे आलात तर चंद्रभागा नदी प्रथम दर्शिनी येते आणि बस थांबा आहे . भीमा नदी हि पंढरपूर मध्ये येऊन चंद्र कोरी प्रमाणे वळसा घालते यासाठी त्याला चंद्रभागा असे संबोधले जाते . गूगल मॅप वरून पाहिल्यास आपल्याला चंद्रभागा खालिलप्रमाणे दिसेल .

चंद्रभागा नदी पंढरपूर 

पंढरपुरातील मंदिरे  , मठ  आणि प्रसिद्ध ठिकाणे
  • विठ्ठल रुख्मिणी मंदिर 
  • पुंडलिक मंदिर 
  • कैकाडी महाराज मठ 
  • तनपुरे महाराज मठ 
  • गजानन महाराज मठ 
  • चंद्रभागा नदी 
आषाढी आणि कार्तिकी एकादशी दिवशी पंढरपुरात लाखो संख्येने भाविक पायी दिंडी करून देशातून आणि परदेशातून येतात . पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असे आहे कि येथे १२ महिने गर्दी असते . दर्शनसाठी वारी काळात दर्शन रांगा लांब पर्येंत जातात तरी भाविक विठूमाऊलीचे दर्शन घेऊनच जातात . वारकरी लोकांचे अभंग , टाळ आणि मृदूंगच गजर ह्या संपूर्ण पंढरी चेतन्यमय वातावरणाने दुमदुमते . 

दर्शनसाठी जाण्यासाठी आपण कधीही जाऊ शकतो , जर वारी काळात गेल्यास आपल्याला वारीची सर्व माहिती मिळेल . 

राहण्याची ठिकाणे : पंढरपूर मध्ये वारी च्या काळात राहण्याच्या व्यवस्था थोड्या अवघड होतात . पण घरगुती व्यवस्था मध्ये आपण राहू शकतो . तसेच धर्मशाळा , मठ आणि लॉजेस ची सोय देखील मिळते . 

जेवणाची सोय : सर्व प्रकारचे शाकाहारी जेवणाची सोय उपलब्ध आहे .

आशा करत आहे कि , दिलेली माहिती आपल्याला उपयोगी आलेली असावी आणि आपली यात्रा संपन्न होवो . 
पंढरपूर ठिकाण हे पवित्र आणि तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे तरी सर्वत्र स्वछता ठेऊन परिसर स्वच्छ ठेवावा आणि दुसऱ्या भाविकांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी . 

आपल्याला जवळच्या गोपाळपुर, तुळजापुर, अक्कलकोट अशा तीर्थ क्षेत्रांत भेट देवु शकतात .

जय जय विट्टल 




No comments:

Post a Comment

Thanks for the comment!