Sunday, December 8, 2019

शून्य घन कचरा आणि पर्यावरण संवर्धन


शून्य या नावातच सर्व काही स्पष्ट होत कि, पर्यटन म्हणजे tourism  , आणि पर्यटक जेव्हा केव्हा बाहेर जातो तेव्हा खूप साऱ्या गोष्टीतून कचरा निर्माण करून येतो.  प्रश्न असा आहे कि ,
प्रवासादरम्यान आपण कचरा कमी करू शकतो का ? किंवा आपल्या रोजच्या जीवनात कचरा कमी करू शकतो का ? 
मी म्हणेन हो का नाही.

आपण बाहेर जाण्यासाठी सहलीला जाणे का निवडतो ? उत्तर म्हणजे आपल्या नियमित दिनक्रमातून थोडा वेळ निसर्ग सुंदऱ्यात  आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर येण्यास.
समुद्र, पाण्याचे धबधबे, नैसर्गिक स्थळे, तलाव, जलाशय, पर्वत इत्यादी निसर्ग निर्मित ठिकाणे पाहण्यास  आणि एन्जॉय करण्यास . पण हल्लीच्या काळात ह्या ठिकाणी लोक फिरायला तर येतात पण घन कचरा सोडून जातात .

तर ह्या ब्लॉग मधून आपणास घरात आणि पर्यटनातं कचरा न करणे  आणि पर्यावरण संवर्धन कसे  राखायचे या विषयी माहिती घेऊया .

शून्य कचरा याचा अर्थ असा होत नाही की कचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया सुलभ केल्याने आपण सामग्री कमी करत नाही,  तर नॉन डिग्रेटेबल म्हणजे संपुष्टात न येणाऱ्या वस्तू यांचा वापर थांबवणे (प्लास्टिक) आणि कमी करणे / पुनर्वापर करणे / रीसायकल करणे . प्लॅस्टिक कचरा हे आजूबाजूचे सौंदर्य नष्ट करीत आहे आणि याचा परिणाम म्हणून सर्व जगभरातून शून्य घन कचरा आणि पर्यावरण संवर्धन हि मोहीम हाती घेतली आहे. जी घरगुती वापरामध्ये पण घरातील कचरा कमी करू शकते .


बहुतेक जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, टिशू पेपर, कॉफी मग, प्लास्टिक वाहून नेणारी पिशवी इत्यादीसारख्या डिस्पोजेबल वस्तूंचा वापर करतो.  तेव्हा ही काही थोडीच उदाहरणे आहेत जी पर्यावरणमध्ये कचरा वाढवत आहेत आणि परिणाम करत आहेत.

काही दिवसांपूर्वी माझा मित्र श्री गणेश बोरा आणि त्यांच्या टीमने पुणे येथील पिंपरी चिंचवडमध्ये पुढाकार करून २ प्रकल्प सुरू केले आहेत , जे शून्य घन कचरा आणि पर्यावरण संवर्धनातं आज खूप महत्वाची ठरत आहेत, ती खालील प्रमाणे   .
  • पवना नदी प्रदूषण वाचवणे 
  • कचरा व्यवस्थापन

पिंपरी चिंचवड पुणे येथे त्यांनी यशस्वीपणे सुरू केलेले हे 2 उपक्रम शून्य घन कचरा आणि पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण यासाठी हे अतिशय सोप्या आणि किफायतशीर मार्ग आहेत. गणेश  हे मुळात अभियांत्रिकीच्या पार्श्वभूमीचेच आहेत पण पर्यावरण आणि नदी संवर्धन हे कामे खूप वर्षांपासून करत आहेत , यांच्या पुढाकार मुळे त्यांनी नदी आणि कचरा व्यवस्थापनाचे तंत्र वाचविण्यासाठी खूप गोष्टी साध्य होत आहेत . बर्‍याच ते सोसायट्यांमध्ये भेट देतात  आणि घन कचरा पासून  कंपोस्ट कसे बनवायचे आणि शून्य कचरा व्यवस्थापनावर कसे कार्याचे याचे मार्गदर्शन करतो . शून्य कचरा प्रवासाची ही संस्कृती अन्य देशांमध्ये आधीच सुरू झाली आहे, म्हणून हे सोपे उपाय  करून पर्यावरण प्रारंभ करू या. ह्या ब्लॉग च्या शेवटी सर्व उदाहरणे दिली आहेत . 

 विचार करा शून्य घन कचरा आणि पर्यावरण संवर्धन का महत्वाचे आहे:
अशी कल्पना करा की जर एखादी व्यक्ती किंवा कुटुंब दररोज १ डस्टबिन साधारणतः (३ लीटर / ३ किलो) कचरा कचरा करीत असेल तर महिन्यामध्ये ९० किलो आणि वार्षिक १०८ किलो कचरा वातावरणात भर घालत आहे. नॅशनल गेओग्राफिक च्या मतेः जगात दिवसातून किमान ३.५ दशलक्ष टन प्लास्टिक व इतर घनकचरा निर्माण होतो. त्यातील काही संपुष्टात पण येत नाही. जर आपण त्यातील काही भाग कमी केला तर पर्यावरणाला त्याचा चांगला फायदा होईल. 

शून्य घन कचरा आणि पर्यावरण संवर्धन कसा सुरू करावा आणि कचरा कमी कसा करावा?
कचरा व्यवस्थापित करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी काही उदाहरणे येथे दिली आहेत.

    • बांबूचा दाताचा ब्रश: बांबूपासून बनविलेले इको फ्रेंडली ब्रश हे प्लास्टिक प्रदूषणाचा वापर कमी करतात. ह्यामुळे प्लास्टिक चा कचरा कमी होतो , जुन्या काली कडुनिंब याचा ब्रश बनून वापर करण्यात येत असे , पण काळानुरूप आपल्याला आजचा मिळणारा ब्रश खाली दिला आहे 

    •                
    • झिरो वेस्ट पार्टी: स्टील डिनर वेअर हे जर आपण डिस्पोजेबल प्लेट्स आणि वॉटर ग्लास चा जागी वापरल्यास  प्रदूषण आणि कचरा कमी होण्यास मदत होते . आपल्या पार्टीला संस्मरणीय  करण्यासाठी आणि इको कटलरी चा वापर चालू करा .          
    • पिशव्या: प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी करा आणि दुकानातील दुकानदारांना प्लास्टिक नको सांगायची सवय लावा. खिशात मोबाइलल फोनपेक्षा वजन कमी असणारी लहान पिशवी नेहमी ठेवा.
    • जर हॉटेल मधून जेवण घेऊन जात असाल तर आपल्या स्वत: च्या स्टीलच्या डबा घेऊन जा आणि आपल्या खरेदीवरील पॅकेजिंग खर्च वाचवा.
    • कॉफी मग : कॉफी घेणे चांगले आहे परंतु नियमित डिस्पोजेबलऐवजी ते पुन्हा वापरण्यायोग्य कॉफी मगपासून असले पाहिजे. आजकाल दुकानात सिरॅमिक किंवा स्टील च्या कॉफी मग मिळतात आणि त्याचा वापर ८ तास कॉफी गरम ठेवण्यास होतो . 
    • रुमाल: बर्‍याचदा पेपर नॅपकिन च्या गोंधळामुळे मोठा घोळ होतो, पॅक केलेल्या ह्या पेपर पासून बनवलेले कागदांऐवजी रुमाल वापरण्यास सुरवात करा.
    • पाणीचे अरेटर (Water saving aerators): पाण्याची बचत हा देखील पर्यावरणाचा बचाव करण्याचा एक भाग आहे, या रेटरमुळे प्रवाहाचे प्रमाण कमी करून 70% पर्यंत पाणी वाचू शकेल. खालील चित्रात पाणीचे अरेटर दिले आहे जे आपण आपल्या घरातील नळावर बसू शकतो , अंदाजे १०० रुपयात बाजारात मिळतात 
शून्य घन कचरा आणि पर्यावरण संवर्धन  ला  Reduce (कमी करणे ) , (reuse ) (पुनर्वापर करणे) आणि recycle (पुन्हा प्रक्रिया करून उपयोगात आणणे ) सहाय्याने मला आणखी 2 महत्त्वाच्या अटी जोडायच्या आहेत आणि त्या म्हणजे  (Refuse ) नकार/वापर ना करणे  आणि compost (कंपोस्ट करणे ) आहेत .

  • (Refuse ) नकार/वापर ना करणे: प्लास्टिक आणि डिस्पोजेबल वस्तूंमध्ये काहीही खरेदी करण्यास नकार देणे आवश्यक आहे, पुन्हा वापरण्यास योग्य उत्पादनाची सवय ठेवा, ह्या पोस्ट मधून  रेस्टॉरंट्स आणि विक्रेत्यांना विनंती आहे की जर ग्राहकांनी त्यांच्याकडे पुन्हा वापरण्यायोग्य बॉक्स घेत असतील तर त्यांना सवलत द्यावी. . छोट्या छोट्या गोष्टी नाही म्हणायला शिका.
  • कंपोस्ट: कचरा 80०% सेंद्रीय आहे म्हणूनच कंपोस्ट हा पर्यावरणाला मदत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
शून्य घन कचर्‍याचे फायदे:
  • वेळ आणि पैसा: जर आपण आजपासून आपल्या शून्य कचरा व्यवस्थापनाची योजना आखत असाल तर हे ट्रिपमधून आणि आपल्या स्वतःच्या घरामधून प्लास्टिक कमी करून आपल्या स्वत: च्या बजेटवर वार्षिक 40% बचत करेल.
  • यामुळे आपली अर्थव्यवस्था वाढण्यास मदत होईल
  • हे पर्यावरण संवर्धन  आणि संसाधनांचे संरक्षण करेल
  • हे प्रदूषण कमी करेल
  • हे कचर्‍यासाठी उत्तम वयवस्थापनास संधी निर्माण करेल
ट्रॅव्हलवर माझे इतर ब्लॉग्ज वाचत रहा आणि कमेंट बॉक्समध्ये त्या विषयावर भाष्य करा. 
प्रवासामध्ये आणि परिसरमध्ये आपले सभोवताल स्वच्छ ठेवण्यास विसरू नका.






No comments:

Post a Comment

Thanks for the comment!